Skip to main content

Posts

Featured

उंबरठा - भाग ६

प्रिय, त्याला काय अधिकार आहे  माझ्या ड्रेसबद्दल बोलायचा ???  तेही सर्वांसमोर... मी रोज नीटनेटके, स्वच्छ कपडे घालून येते ना ऑफिसला... टापटीप असते... मग ह्याचा काय प्रॉब्लेम आहे ??? मी काहीही ड्रेस घालीन, हा कोण सांगणारा ???? तरी बरं स्वतः सगळे उद्योग करतो, त्याबद्दल आम्ही कधी काही बोलत नाही.. तू म्हणशील, मला माझ्या हुद्दामुळे त्याच्याबद्दल बोलताच येणार नाही… हो... मान्य आहे मला तू म्हणतोस ते... पण चीड चीड झाली कि जाम वैताग येतो... त्याला काय वाटतं मांजर डोळे मिटून दूध पित असेल तरी दुनियेला दिसत नाही का ???? ऑफिसमधल्या त्या प्रसंगाने भूतकाळातील अनेक गोष्टी समोर आल्या... सात वर्षांपूर्वी माझं काय होतं ???  फक्त बंधनं... आता माझाच विश्वास बसत नाही की love marriage केलं होतं... आणि boyfriend लग्न झाल्यावर, म्हणजे नवरा झाल्यावर एवढा बदलू शकतो ह्यावरही तेव्हा विश्वास बसला नव्हता... ऑफिसमध्ये अनुभव आला होता, की designation change झालं की माणसं बदलतात, पण इथे प्रत्यक्ष माझा boyfriend बदलला होता... हे साहजिक होतं का नव्हतं हेही कळायला वेळ मिळाला नाही... गोष्टी झपाट्याने बदलल्या...  साधी गोष्ट घे

Latest Posts

उंबरठा - भाग ५

उंबरठा - भाग ४

उंबरठा - भाग 3

उंबरठा - भाग 2

उंबरठा - भाग 1

सुमाची मेघा...! (भाग 4)

सुमाची मेघा ... ! (भाग - 3)

सुमाची मेघा... ! (भाग 2)

सुमाची मेघा ... ! (भाग - १)

आई (भाग - शेवटचा)