उंबरठा - भाग ४


प्रिय,

आज पहिली शिफ्ट संपायला थोडा उशीर झाला, त्यामुळे ऑफिसला उशिरा पोचले... लेट मार्क मिळणार नक्की... पण ऑफिसला पोचले तर गम्मत झाली... सगळे बाहेरच उभे होते... म्हटलं काय झालं, असे बाहेर का उभे आहात? कारण हे होतं कि ACCESS CONTROL SYSTEM काम करत नाहीये आणि त्यामुळे दरवाजा उघडत नाहीये... हुरररे... म्हणजे नो लेट मार्क (मनातल्या मनात म्हटलं)... पण हा प्रोबेलम मलाच सोडवायला लागणार होतं व्हेंडरशी बोलून, त्यामुळे थोडी नाराजही झाले.. 

ह्यातली गम्मत कळली का तुला ? मशीनने दगा दिला तर लेट मार्क नाही, पण घराच्या कामाच्या भरात उशीर झाला तर लेट मार्क... वाह रे.. काय IRONY आहे ना ! म्हणजे जास्त विश्वास कोणावर, तर मशीनवर ...! जळलं मेलं लक्षण... !

तू बघत बस माझी गम्मत... माझी धावपळ तुला गम्मतच वाटते... पण आज दार उघडलं नसतं तर तुला ओलांडून ऑफिसमध्ये आलेच नसते... मग एकटाच बसला असतास...

असो, दिवसाची सुरुवात म्हणावी तितकी चांगली झाली नाही आणि कामांमध्ये काही ना काही अडथळे येतच गेले. त्यात भर म्हणून एक बातमी कानावर आली आणि मन पुन्हा अस्वस्थ झालं. 

माणूस म्हणून जगायचं आणि दुसऱ्यालाही माणूस म्हणून जगू द्यायचं, हे जरी सगळयांना कळलं तर किती छान होईल ना... हा साधा सरळ नियम लोकांना कधी कळेल? लोकं राक्षसी वृत्तीची का असतात ? माणसं राक्षसी वृत्तीची असतात कि होतात ? असे असंख्य विचारांचं थैमान मनात निर्माण झालं कारण निर्भया केस मधील आरोपींना फाशीची शिक्षा झाली निश्चित झाली... श्या, ह्या अपराध्यांना यातना न होता मृत्यू...? मूर्खाचा बाजार... जळलं मेलं लक्षण... तळपायाची आग मस्तक गेली... ह्या साल्यांना भर चौकात बांधून ठेवायचं आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी मार द्यायचा... मृत्यूसाठी तडपले पाहिजेत... 

डोकं सुन्न झालं होतं... खूप helpless वाटत होतं... तिची काय अवस्था झाली असेल ??? 

ती एक स्त्री होती म्हणून आणि इतर पुरुष होते म्हणून तिला पराकोटीचे अत्याचार सहन करावे लागले होते... बलात्कार... बलात्कार... हा शब्द घुमत होता... 

ह्यावर सुरेशचं एक वाक्य आठवलं... पुरुषाची भूक घरी भागली तर तो हॉटेलमध्ये जेवायला जाणार नाही... हे वाक्य ऐकून माझी बोलतीच बंद झाली होती आणि ह्यापुढे जेव्हा जेव्हा सुरेश जवळ आला तेव्हा तेव्हा मला हे वाक्य आठवायचं, टेन्शन यायचं, प्रचंड त्रास व्हायचा... कधी हि न शमणारी भूक ??? ह्या भावनांना मर्यादेचा उंबरठा पार करू द्यायचा नाही... शक्य आहे का हे ??? लक्ष्मण रेषा फक्त स्त्रीसाठीच असते का रे ???

बोल ना रे काही ...! 

-आरुशी दाते

Comments

  1. अस्वस्थ करणारं मात्रं अगदी प्रत्येक स्त्रीच्या मनात उमटणारे प्रश्न उपस्थित केले आहेस आरुशी 👍

    ReplyDelete
  2. स्त्री मनाचे दर्शन घडवणारा हा लेख. वास्तव लिखाण. लिहीत रहा.

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेखन 👌👌

    ReplyDelete
  4. सुरेख लेखन

    ReplyDelete
  5. अप्रतिम लेख 👌

    ReplyDelete
  6. अप्रतिम 👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts